Pune News : पुणे : मराठा समाजबांधव सुनील कावळे यांच्या आत्महत्येमुळे मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत ज्यांनी आत्महत्या केली, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. या आत्महत्या सरकारच्या भूमिकेमुळेच होत आहेत. त्यामुळे सरकारच याला सर्वस्वी जबाबदार आहे. हा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजगुरूनगर येथील सभेत बोलताना दिला.
पुण्याच्या राजगुरुनगर याठिकाणी झालेल्या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांग पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. १०० एकर जागेवर जरांगे पाटील यांची ही सभा होत आहे. शांततेचे युद्ध सरकारला पेलणार नाही असे देखील जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. (Pune News ) मनोज जरांगे म्हणाले, मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाहीत. मी हार, तुरे स्विकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गावागावात फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर या आत्महत्या झाल्याच नसत्या.
आरक्षण नसल्यामुळे आमच्या पिढीच्या वाट्याला अपार कष्ट
मराठा समाज हाच माझा मायबाप आहे. त्यांच्या शब्दापुढे मी कधीच जात नाही. आजपर्यंत आरक्षण नसल्यामुळे आमच्या पिढीच्या वाट्याला अपार कष्ट आले आहेत. परंतु आमच्या पुढच्या पिढीला, आमच्या लेकरा-बाळांच्या वाट्याला हे येऊ नये, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. (Pune News ) पण सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की पुरावे लागतात. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ, असे म्हणत सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला. समाजाने त्यांना ४० दिवस विचार करायला दिले. सरकारला मुदत दिल्यानंतर हालचालींना वेग आला, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आरक्षणामागील भूमिका स्पष्ट केली.
सभेसाठी उपस्थित सर्व मराठा समाजबांधवांना माझे एकच सांगणे आहे. मी मरेपर्यंत मराठा समाजाशी गद्दरी करणार नाही. माझ्या जातीला न्याय देण्यासाठी मी उभा आहे. आमचे हे आंदोलन शांततेत सुरू आहे. आता शांततेचे शस्त्र वापरूनच आरक्षण मिळवणार, हा माझा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे हटणार नाही. (Pune News ) यापुढे २४ तारखेपर्यंत मी काहीही बोलणार नाही. आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला ठरणार आहे. यापुढे आंदोलन करताना गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घेणार. कोणत्याही प्रकारचा उद्रेक करणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार..
Pune News : येत्या दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
Pune News : भाजप नेत्याची बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल