Pune News : पुणे : साध्या गाडीपेक्षा जलद आणि परवडणाऱ्या दरात निमआराम सेवा देणारी एसटी महामंडळाची हिरकणी बस सेवा आता नव्या धाटणीत प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. यादरम्यान मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना नव्या हिरकणी सेवेचा लाभ मिळणार आहे. स्वारगेट- मंत्रालय या मार्गावरून सोमवारीपासून नवीन हिरकणी बस सेवा चालू करण्यात आली आहे. राज्य परिवह महामंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. (Good news for ST passengers; ‘Swargate-Mantralaya’ new Hirakni service started)
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी
पुण्यातून मुंबई येथे मंत्रालयात अनेक कर्मचारी, अधिकारी ये जा करत असतात त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातील दोन नव्या हिरकणीची सेवा‘स्वारगेट-मंत्रालय’या मार्गावर चालवण्यास सुरुवात झाली आहे. (Pune News) स्वारगेटवरून सकाळी ५.४५ वाजता हिरकणी बस सुटेल आणि ही साधारण सकाळी ९/९.३० पर्यंत मंत्रालयात पोहचेल. त्यानंतर ही बस सकाळी १० च्या दरम्यान मुंबई सेंट्रल आगारात दाखल होऊन तेथून स्वारगेटकडे रवाना होईल, असे नियोजन केल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एसटी महामंडळाने स्व:बनावटीची हिरकणी तयार करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण २०० नव्या हिरकणी तयार केल्या जात आहेत. सध्या रायगड, पुणे विभागाच्या ताफ्यात नवी हिरकणी दाखल झाली आहे.
नवीन हिरकणीची वैशिष्ट्ये
दापोडीस्थित एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत हिरकणीची बांधणी सुरू आहे. बस आकर्षक दिसावी म्हणून आतील बाजूस थर्मोप्लास्टिक शीट लावण्यात आली आहे. (Pune News)प्रवासी संरक्षणासाठी आणि स्क्रू दिसू नयेत यासाठी स्क्रू हेडवर कॅप कव्हर लावण्यात आले आहे. रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग सॉकेटची सुविधा असलेली तयार हॅटरॅक पुरविण्यात आली आहेत. प्रवाशांसाठी मॅगझिन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर तसेच बॅग हूक इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. गतिरोधक, खड्डे यांवरून धावताना प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी एअर सस्पेन्शनसह आरामदायक आसने देण्यात आली आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?
Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!
Pune News : पुण्यात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून