Pune News : पुणे : भारतीय रेल्वेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्रोथ इंजिन’असा केला आहे, तो अतिशय समर्पक आहे. भारतीय रेल्वेला अधिक बळकट बनविण्याचे पंतप्रधानांचे ध्येय आहे. रेल्वे प्रवाशांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या सेवेचा अनुभव देण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असून, त्यासाठी रेल्वेच्या कार्यप्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात येत आहे. आता भारतीय रेल्वेने पुणे आणि लोणावळा दरम्यान नवीन प्रणाली बसवण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे एक्स्प्रेसच्या वेळेत बचत होणार आहे. त्याचबरोबर सिग्नल बदलून दोन रेल्वेच्या वेळेत बचत करण्यात येणार आहे. एक्स्प्रेससाठी प्रथमच ही प्रणाली उपयोगात आणली जाणार आहे.
ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचे काम सुरु
लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी सबर्बन नेटवर्क प्रणाली वापरण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे सिग्नल सिस्टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. लांब पल्यांच्या गाड्यांसाठी १० किलोमीटर लांबीवर दोन सिग्नल असणार आहेत. दोन सिग्नल दरम्यान दुसरी ट्रेन आल्यास तिला थांबवले जाते. आता यावर काम सुरु केले आहे. यामुळे दोन ट्रेन दरम्यान अंतर कमी करणे, (Pune News ) सिग्नल प्रणाली सुधारणे यावर काम केले जात आहेत. मुंबई सबर्बन नेटवर्कमध्ये दोन सिग्नलमधील अंतर फक्त ४०० मीटर आहे. काही ठिकाणी डेमू किंवा मेमू ट्रेन सुरु आहेत, त्याठिकाणी १ किलोमीटरपर्यंत हे अंतर आहे. या प्रणालीला ऑटोमॅटेड ब्लॉक सिग्नलिंग म्हटले जाते. पुणे ते लोणावळा दरम्यान ही प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या दरम्यान २० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेऊन काम करण्यात आले. सध्या चिंचवड-खडकी सेक्शनमध्ये १०.१८ किलोमीटर ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ५४ किलोमीटरवर काम पूर्ण झाले आहे. (Pune News ) यामुळे एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाचणार आहे. मुंबई सबर्बन वगळता दिवा-पनवेल सेक्शनमध्ये ऑटोमॅटिक सिग्नल प्रणाली आहे. मुंबईत कल्याण, कसारा, कर्जत आणि सीएसएमटी यार्डमध्ये रीमॉडलिंगचे काम सुरु आहे. या दरम्यान सिग्नलिंग मॉर्डनाइजेशनचे काम केले जाते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यात तब्बल एक कोटीचा ड्रगचा साठा जप्त
Pune News : अनैतिक प्रेमसंबंधातून कोंढव्यात मुलाला जीवे मारण्याची धमकी
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट