Pune News : पुणे : वाहतूक कोंडीचा अनुभव पुणेकरांसाठी नवीन नाही. कित्येकवेळा शहरात वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागतात. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता शहरातील वाहतूक स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांना मुक्त करण्यासाठी नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रणाली सुरु होणार आहे.
वाहतूक कोंडीतून पुणेकरांना मुक्त करण्यासाठी स्मार्ट सिग्नल प्रणाली
वाहतूक नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी स्मार्ट सिग्नल प्रणाली पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनने विकसित केली आहे. ही प्रणाली एडटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) म्हणून ओळखली जाते. यामध्ये कॅमेरा आणि सेन्सरचा उपयोग करुन वाहतूक नियंत्रित केली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून कमी वाहने असतील, (Pune News) त्याठिकाणी सिग्नल लवकर ग्रीन होईल. जास्त वाहने असतील त्याठिकाणी जास्त कालावधी लागेल, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी दिली.
या सिग्नल प्रणालीत विशिष्ट टाईम सेट केलेला असतो. कॅमेरा आणि सेन्सॉरच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रित केली जाते. दरम्यान, ही प्रणाली येत्या १५ दिवसांत ९५ सिग्नलवर बसवली जाणार आहे. त्यासाठी आधी या ठिकाणावरचा डाटा तयार केला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केले गेले आहे. (Pune News) त्यासाठी सिंहगड रोडवरील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार केला गेला आहे. या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने ५८ कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला दिला आहे.
रुग्णवाहिका, पोलीस गाडी, अग्निशामन दल यांना ATMS प्रणालीद्वारे ग्रीन सिग्नल मिळणार आहे. या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे. पुणेकरांचा वेळ वाचणार आहे. कमी वेळेत पुणेकरांना घरी किंवा कार्यालत जात येणार आहे. संपूर्ण शहरात ही प्रणाली ९५ ठिकाणी बसवली आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात बसवली जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांना खूषखबर; आता “या” नव्या शहरांमध्येही विमाने उडणार