Pune News : पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातून लोहगाव विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या ठिकाणावरुन २४ तास विमान वाहतूक शक्य झाली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातून अनेक नवीन शहरांमध्ये विमानसेवा सुरु झाली आहे. पुणे शहर देशातील विविध भागांशी हवाई सेवेने जोडले जात असल्यामुळे शिक्षण आणि उद्योगांसाठी येणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.
शिक्षण आणि उद्योगांसाठी येणाऱ्या लोकांना फायदा होणार
पुणे शहराचा विकास वेगाने होते आहे. जून महिन्यात पुणे विमानतळावरुन नवी दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, बंगळुरु या शहरांसाठी विमानांची संख्या वाढवली गेली. नवी दिल्ली, बंगळुरु, नागपूरसाठी गो फस्ट या कंपनीकडून सात विमानफेऱ्या सुरु केल्या गेल्या होत्या. (Pune News) जुलै महिन्यापासून राजकोट, वडोदरा या शहरांतही विमानसेवा सुरु झाली. आता पुणे शहरावरुन भोपाळसाठी सेवा सुरु होणार आहे. राजा भोज इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन आकाश कंपनीकडून पुणे-भोपाळ सेवा सुरु होणार आहे.
दरम्यान, पुणे शहरातून सध्या दररोज १७८ ते १८४ विमानाचे आगमन आणि प्रस्थान होते. पुणे लोहगाव विमानतळावर ५ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर उभारले गेले आहे. (Pune News) अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल या ठिकाणी बांधले गेले आहे. यामुळे एक कोटी प्रवासी पुणे विमानतळावर दरवर्षी जाऊ शकतात.
पुणे शहरात नुकतेच चांदणी चौक पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पुण्याच्या विकासावर या वेळी चर्चा झाली. (Pune News) तसेच पुणे पुरंदर विमानतळाच्या कामाला वेग देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे लवकरच दुसरे विमानतळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पत्नी असल्याचे सांगत मैत्रिणीचे फोटो केले व्हायरल