Pune News : पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी शाडू माती अथवा कागदी लगद्यासारख्या विघटनशील घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. सार्वजनिक मंडळांनी चार फुटांपर्यंत, तर घरातील गणेशमूर्तीची दोन फुटांपर्यंत उंची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनास प्रतिबंध आहे. घरगुती आरास व देखाव्यांसाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये, असे नियम असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. आता गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी समाधान व्यक्त केले.
गणेशोत्सव मंडळांकडून समाधान व्यक्त
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली होती. (Pune News) तर गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पालिकेने राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
पीओपी मूर्ती व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगातील विषारी घटक यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जाते आहे. (Pune News) या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी व त्याची संयुक्तिक कारणे राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी मांडले.
दरम्यान, पीओपीमधील घातक घटक बाजूला करून मूर्ती कशा तयार करता येतील, याबाबत शास्त्रज्ञांची समिती नियुक्ती केली जाईल. (Pune News) या समितीचा अहवाल येईपर्यंत व पीओपीला सक्षम पर्याय मिळत नाही, तोपर्यंत गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती पीओपीच्या राहतील. तसेच, मूर्तींच्या उंचीची मर्यादाही काढून टाकावी, या मंडळांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मान्यता दिली आहे.
अग्निशामक दलाकडून यंदा घेण्यात येणारे हमीपत्र मंडळांच्या दृष्टीने फार अडचणीचे आहे. या दोन्ही हमीपत्रात दिलेल्या अटी व शर्तींचा पुनर्विचार करून नव्याने हमीपत्र तयार करावे, अशी मागणी समितीने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अबब! शेवग्याला लगडल्या तब्बल साडेचार फूट लांबीच्या शेंगा
Pune News : पारदर्शक निकालासाठी ईव्हीएमचे आधुनिकीकरण व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस
Pune News : लवासात उभारणार पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वांत उंच पुतळा? एवढी असेल उंची…