Pune News : पुणे : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑनलाईन सोडत लवकरच होणार आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारले!ल्या 5863 सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येऊ शकणार आहे.
20 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत
नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. (Pune News ) 5 सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार, आत्तापर्यंत 32 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यात मुदत वाढवून मिळावी, अशी मागणीदेखील नागरिकांकडून केली जात होती. (Pune News ) अखेर पुणे मंडळाने सोडतीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेकडो नागरिकांना होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात विसर्जन मार्गावरील दणदणाटाने थरकाप; ओलांडली आवाजाची मर्यादा
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पांचे ८ वाजून ५० मिनीटांनी मोठ्या थाटात विसर्जन…
Pune News : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी… भक्तीमय वातावरणात मानाच्या बाप्पांना निरोप!