Pune News : पुणे : पुण्यासह राज्यभरात दहीहंडी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी पाहण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर हजारोंची गर्दी उसळते. त्यामुळे उद्या पुण्यातील रस्ते ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जाणून घ्या वाहतूकीतील बदल…
– शिवाजीरोडवरुन स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक पुढे टिळक रोड, शास्त्री रोडने जाता येईल.
– पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जाता येईल.
– स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिकेकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशीची राणी चौकात डावीकडे वळून जावे.
– बुधवार चौकातून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने होईल.
– रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, पर्यायी मार्गाचा वापर करावा.
– सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. ही वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.
– शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.
– गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.
दहीहंडी पाहण्यासाठी आलेले नागरिक तसेच इतरांनी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.