Pune News : पुणे : पुणे शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदाशिव पेठ या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या झालेला कोयता हल्ला, दर्शना पवार खून प्रकरण या घटनांमुळे हे अधोरेखित झाले. या दोन्ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्या होत्या. आता मुलगी प्रेमाला प्रतिसाद देत नाही, या रागातून तीचे फोटो काढून, मुलाने ते सोशल मिडियावर व्हायरल केले. एवढ्यावरच न थांबता, ही माझी बायको असल्याचे कॅप्शन त्या फोटोखाली टाकले. या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या संबंधित मुलीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
मुलीने उचलले टोकाचे पाऊल…
औंध भागात राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवकाचे १४ वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र, मुलगी मुलाच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. (Pune News)तीने होकार द्यावा यासाठी मुलगा सतत तिचा पाठलाग करत होता. मुलगी प्रतिसाद देत नसल्याने संबंधित मुलाने मुलीचे काही फोटो काढले. ते सोशल मीडियावर स्वत:ची पत्नी असल्याचे सांगत शेअर केले. दरम्यान, मुलीला हा प्रकार समजल्यावर तिला मोठा धक्का बसला.
याबाबत अधिक माहिती देताना चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक बाबासाहेब जरेकर म्हणाले की, मुलीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. या धक्क्यातूनच तीने टोकाचे पाऊल उचलले. (Pune News) राहत्या घरात आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
दरम्यान, हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने मुलीला वाचवले. त्यानंतर मुलीने घरात या सर्व प्रकाराचा खुलासा केला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी याची तक्रार केली. (Pune News) यावरुन पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाची चौकशी सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दुसऱ्याची नाव तिसऱ्याला विकून लाखोंचा गंडा; आरोपी गजाआड
Pune News : खडकीतून कर्नलचे पिस्तुल आणि २० जिवंत काडतुसांची चोरी