Pune News पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळ उडवून देणारी घडना घडली होती. पुण्यात भर दिवसा अशी घटना घडल्याने चांगलेच राजकारण तापले आहे. (Pune News) बड्या राजकीय नेत्यांने राज्यसरकारसह पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता पोलिस प्रशासनाला जाग आली असून ऑक्शनमोडवर या हल्ला प्रकरणी पोलीस हवालदारासह 3 पोलिस कर्मचारी निलंबित करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune News)
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका….
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
असे घडली घटना….
संबंधित तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत असताना आरोपी शंतनू जाधव हा तरुण तिथे आला. त्याने बागेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला आणि शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.
शंतनू जाधव हा हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग करत होता. एवढ्यात या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेऊन तरुणीचा जीव वाचवला. यानंतर शंतनूला चोप देत पेरू गेट पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांचा वचक राहणार…??
पुणे शहर शांततेचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतू गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. भरदिवसा खुलेआम हातात कोयते, तलवारी घेवून दहशत निर्माण केली जात आहे. त्यमुळे पुण्याची ओळख आता गुन्ह्याचे शहर म्हणून होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे भुरट्या चोरट्यांपासून गुंडाच्या टोळीचे आव्हान आहे. या घटनेनंतर आता पुणे पोलिस गुन्हेगारांवर वचक ठेवणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करु लागले आहेत.