Pune News : पुणे : पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतात. मानाच्या पाच गणपती मंडळांचे देखावे, दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांचे देखावे आणि आकर्षक सजावट हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मंडळांकडून तयारी सुरु असतानाच प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. दरवर्षी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भव्य-दिव्य देखावे साकारतात. यंदा मात्र, पुणे प्रशासनाकडून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.
अधिक उंच असल्यास स्थापत्य अभियंत्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार
आता पुढील पाच वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, मंडपासाठी दिलेल्या परवानगी ग्राह्य धरणार आहेत. तसेच परवान्यांसाठी पुणे महापालिकेतर्फे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. (Pune News) गणरायाच्या स्थापनेसाठी उभारण्यात येणाऱ्या उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा उंच नसावी, ४० फुटापेक्षा उंच मंडप असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे लागणार आहे.
गणेश उत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. रात्री उशिरापर्यंत देखावे सुरु असतात. यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. (Pune News) त्यानुसार पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत १२ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
विसर्जन मिरवणूक वेळेवर पार पाडण्यासंदर्भात चर्चा झाली. यंदापासून गणरायाचे विसर्जन वेळेत होण्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी ४.३० वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तसेच विसर्जन वेळेत होण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.(Pune News) त्याला गणेश मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : ऐन श्रावणात पुणेकर उकाड्याने हैराण; १९०१ नंतर यंदाचा ऑगस्ट सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद
Pune News : राज्यात मान्सूनची हुलकावणी; खडकवासला धरण क्षेत्रात केवळ २७.६० टीएमसी पाणीसाठा
Pune News : जालन्यातील लाठीमारानंतर पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ