Pune News | पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या गुरुवारी (दि.27) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि.28) उशिरा कमी दाबाने पाणी येणार आहे. विद्युत, पंपिंगविषयक आणि स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पालिकेच्या पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग, भामा-आसखेड या मुख्य पाण्याच्या लाईनची दुरुस्ती कामासाठी व फ्लो मीटर बसविणे ही दुरुस्ती कामे असल्याने उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा परिसर…
तळजाई, धनकवडी, बिबवेवाडी परिसर तळजाई वसाहत व पद्मावती परिसर, संभाजीनगर, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर परिसर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, अप्पर व सुपर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बैंक नगर, लेक टाऊन सोसायटी, महालक्ष्मीनगर, पुनम गार्डन परिसर, दामोदर सोसायटी, महेश सोसायटी, मनमोहन पार्क, ओम अभिषेक सोसायटी, नीलकमल सोसायटी, मानस सोसायटी.
दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिश्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.
कात्रज कोंढवा बु., अप्पर इंदिरानगर परिसर कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, बरखडेनगर, उत्कर्ष, राजस, भूषण, इंद्रप्रस्थ सोसायटी, माऊली नगर, विद्या नगर, आनंद नगर सुखसागर नगर भाग-1 व 2 शिवशंभो नगर, गोकुळनगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व अप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडीमशीन परिसर, येवलेवाडी, कामठे-पाटील नगर.
श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता.
पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, रेणूकानगर, पॉप्युलर नगर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | वडूजमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट ; दोन महिला जखमी
Pune News | 12 व्या जिल्हा संघ निवड योगासन स्पर्धा उत्साहात
Solapur Crime | बार्शी येथे टेम्पोसहित २२ पोती ओला चंदन पकडला! दोन चंदन तस्करांना अटक