Pune News : डेंग्यूच्या आजारामुळे पुण्यात पहिला बळी गेला आहे. तर शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैमध्ये संशयित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. यंदा पहिल्यांदाच एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद या महिन्यात झाली आहे.(Pune News)
डेंग्यूच्या आजारामुळे पुण्यात पहिला बळी गेला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात हि संख्या ५४ वर पोहोचली आहे. आता जुलैमध्ये ही संशयित रुग्णांची संख्या ११० झाली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.(Pune News)
दरम्यान, डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी जुलैमध्ये ५४ निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ३० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या ५४७ नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण १ लाख २३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.