Pune News : पुणे : बोपदेव घाटातील ट्रिनिटी महाविद्यालयाजवळ शनिवारी गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून तपास सुरू
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या परिसरात पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना कळवली. त्यानंतर स्थानिक पोलिसांबरोबरच शहर गुन्हे शाखेचे पथक तेथे पोचले. त्यांनी शोध घेतल्यावर एक पुंगळी सापडली. ती पुंगळा नेमकी पिस्तुलाची आहे, की एअर गनची, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, सापडलेली पुंगळी तपासणीसाठी तज्ज्ञांकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या परिसरात चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Pune News) या घाटामध्ये जोडप्यांना लुबाडण्याचे, तसेच बेकायदा शस्त्रांचा गोळीबार केल्याचे गुन्हे या पूर्वी दाखल करण्यात आले आहेत.
बोपदेव घाट परिसरात नोव्हेंबर २०२२ मध्ये एका व्यावसायिकावर गोळीबार झाला. तपासामध्ये त्याबाबतची फिर्याद खोटी असल्याचे स्पष्ट झाले. (Pune News) त्यानंतर, डिसेंबर २०२२ मध्ये त्या भागात झालेल्या गोळीबारामध्ये गणेश नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी) हा तरुण मृत्युमुखी पडला. दारूच्या नशेत पिस्तुलातून चुकून गोळी उडाल्याने हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची घोषणा