Pune News : पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्या मंडपाच्या ठिकाणी आग लागणे वा तत्सम अपघाताची घटना घडू नये, यासाठी यावर्षी पहिल्यांदाच पुणे अग्निशमन दल व फायर अँन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नावनोंदणी करण्याचे मंडळांना आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गणपती मंडळांनी आपले मंडळ आगीपासून सुरक्षित कसे आहे व त्याकरिता मंडळे काय उपाययोजना करतात हे या स्पर्धेमधून दाखविण्यात येणार आहे. (Pune News) अग्निशमन दल व एफएसएआय संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत आणि जनमानसात याबाबत जागृती व्हावी या दृष्टीकोनातून हि संकल्पना साकारली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शक्यतो मंडळाच्या ठिकाणी कुठेही आग वा अपघात घडू नये याबाबत जागरूक राहून येणारे असंख्य भाविक यांची ही सुरक्षितता कायम राहावी. (Pune News) त्याबाबत सार्वजनिक मंडळांनी नोंदणी करण्याचे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी अग्निशमन दल व एफएसएआय यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत आणि जनमानसात याबाबत जागृती व्हावी या दृष्टीकोनातून ही संकल्पना साकारली आहे.
स्पर्धेसाठी मंडळांनी नोंदणी करताना दिलेल्या अर्जामध्ये माहिती भरुन दिल्यावर त्याची छाननी होऊन अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य हे प्रत्यक्ष मंडळांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे बक्षीस जाहिर केले जाईल. (Pune News) शहरातील जास्तीत जास्त मंडळांनी यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय सुनेची विषारी औषध पिऊन आत्महत्या..
Pune News : एक कोटीचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एक लाख उकळले