Pune News : पुणे: हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग लागण्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अवघ्या २० मिनिटांत ही आग विझवण्यात यश आले. मात्र या आगीत गृहापयोगी साहित्य जळाले. वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर, उपनिरीक्षक माया गावडे घटनास्थळाची पाहणी केली.
गृहोपयोगी साहित्य जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत आंबेडकर मित्र मंडळाच्या शेजारी घरामध्ये शाबाबाई परमेश्वर ठोसर स्वयंपाक करत होत्या. त्या वेळी गॅस सिलिंडरमधून अचानक गळती सुरू झाली. (Pune News) काही क्षणातच आग लागली. प्रसंगावधान राखून शाबाबाई घराबाहेर पळाल्या. हडपसर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने आणि गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टळला. आग लागल्यानंतर या भागात बघ्यांची गर्दी झाली होती.
हडपसर अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, जवान संजय जाधव, नितेश सगळे, अमित सरोदे आदींनी आग आटोक्यात आणली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची फसवणूक