Pune News : पुणे : घरकामावरुन पतीने मारलेले सततचे टोमणे, शिवीगाळ तसेच मारहाणीला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात नुकतीच घडली. नेहा प्रणय ठाकूर (वय २६, रा. जिजाई विहार, मानाजीनगर, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीविरूद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजकुमारी ठाकूर (वय ५५, रा. कोलार रोड, भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) या फिर्यादीनुसार मृत नेहा ठाकूर हिचा पती प्रणय ठाकूर याच्याविरोधात पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा हिचा पती प्रणय गेल्या काही महिन्यांपासून तिचा अतोनात छळ करत होता. (v) घरकामावरुन तिला टोमणे मारुन शिवीगाळ, तसेच मारहाण करत होता. पतीचा छळ असह्य झाल्याने अखेर नेहाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अग्निवीर म्हणून लष्करात भरती करण्याचे आमीष; १६ तरुणांना लाखोंचा गंडा
Pune News : तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार