Pune News : पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता हे अपघात टळून लाखमोलाचे जीव वाचणार आहेत. अपघात टाळण्यासाठी १६० कोटी रुपये खर्च करुन इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली उभारण्यात येत असून, या प्रणालीमुळे अपघात टळणार आहेत. याचबरोबर बेशिस्त वाहनधारकांना नियम मोडणे देखील महागात पडणार आहे.
नवीन प्रणालीमुळे बेशिस्त वाहन चालकांनाही बसणार चाप
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मागील काही वर्षांपासून अपघाताचं सत्र सुरुच आहे. दर महिन्याला मोठे अपघात या मार्गावर होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. या महामार्गावर सामान्यांचाच अपघात होत नाही तर आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आणि सेलेब्रिटींचेदेखील अपघात झाले आहे. (Pune News) या महामार्गावरील अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, अभिनेत्री भक्ती बर्वे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. त्यासोबतच अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी तसंच काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांचेदेखील अपघात झाले आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.
अपघात टाळण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यापासून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली कार्यान्वीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रन्सपोर्ट कॉरपोरेशनकडून ही यंत्रणा उभारण्यात येणार असून, याअंतर्गत महामार्गावर ४३० कॅमेरे असणार आहेत. हे कॅमेरे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. (Pune News) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यासाठी कुसगाव येथे एक कमांड अँड कंट्रोल सेंटर देखील तयार केले असून, येथे बसून महामार्ग पोलीस अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहभागाने चोवीस तास लक्ष ठेवणार आहेत. महामार्गावर बसवण्यात येणारे कॅमेरे सुमारे १७ प्रकारचे वाहतुकीचे उल्लंघन शोधू शकतात.
मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवणार आहे. महामार्गावर एखादे वाहन वेग मर्यादा ओलांडल्यास ‘अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ने तपासणी होईल. ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’मधून लेन मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. डावीकडून जाणारी पहिली लेन अवजड वाहनांसाठी आहे. त्यांना ८० किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे. (Pune News) दुसरी लेन चारचाकी वाहनांची असणार आहे. त्याची वेगमर्यादा १०० किलोमीटर असणार आहे. तर तिसरी लेन ओव्हरटेकची आहे. या लेनमधून ओव्हरटेक करुन पुन्हा आपल्या निर्धारित लेनमधूनच प्रवास करायचा आहे. हे नियम मोडल्यास कारवाई होणार हे मात्र नक्की आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा सहा लेनचा मार्ग आहे. प्रवेश नियंत्रित टोल असलेला हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग आहे. (Pune News) मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. एकूण ९४.५ किलोमीटरचा हा रस्ता आहे. २००२ पासून हा मार्ग कार्यांन्वित झाला होता आणि प्रवाशांच्या सेवेत आला होता. हा महामार्ग बांधण्यासाठी १६.३ अब्ज रुपयांचा खर्च झाला होता. या मार्गावरील वेग मर्यादा ८० किलोमीटर प्रतितास आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बेकायदा सावकारीला कंटाळून एकाची गळफास घेऊन आत्महत्या