Pune News : पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला. आता शहरातील वाहतुकीसाठी बसेसची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. आता शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे दोन मार्गही १ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रो प्रवासासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवृत्त व्हावे, यासाठी प्रवाशांसाठी सवलत योजनाही जाहीर केली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
दरम्यान, पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना प्रवासात सवलत मिळणार असल्याचे सांगितले आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. (Pune News) तसेच अन्य नागरिकांना शनिवारी आणि रविवारी सवलत मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३० रुपयांपर्यंत आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असणार आहे. कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा असेल.
वीजेच्या बचतीसाठी देखील मेट्रो स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवले जाणार आहेत. पुणे मेट्रोच्या २३ स्टेशनवर सौर पॅनल बसवून वीज निर्माती करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या वीज बिलात चांगलीच बचत होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) दरम्यानच्या मेट्रो मार्गांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) मान्यता मिळाली आहे. (Pune News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत दर १० मिनिटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रो उपलब्ध होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसर, वानवडी परिसरातील गुन्हेगारीवर वचक; ६५ गुंड एकाचवेळी जिल्ह्यातून हद्दपार!