युनूस तांबोळी
Pune News : पुणे : मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी कुंटुंबात जनमलेल्या आणि पेशाने कार्यकारी अभियंता असलेल्या आर. वाय. पाटील यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा सन २०२३ चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यालयात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाटील यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले पुरस्कार वितरण
मुंबई येथे राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव मनिषा म्हैसकर–पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दसपुते यांच्यासह बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी या वेळी उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी या खेडेगावात शेतकरी कुंटुबात जन्मलेल्या पाटील यांनी पदविका शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथून पूर्ण केले आहे. पदवी के. आयटी कोल्हापूर व पदव्युत्तर शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून पूर्ण केले आहे. श्री पाटील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सन २००० मधे सहायक अभियंता श्रेणी-२ या पदावर रुजू झाले. २०१६ पासून कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. आंबेगावमधील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (अवसरी) ग्रामीण रुग्णालय, मंचर, आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृह बांधकाम, भिमाशंकर विकास आराखडा, डिंभे येथील भिमाशंकर उद्यान, घोड नदीवरील अनेक पुलांची कामे त्यांनी केली आहेत. जुन्नर तालुक्यात शिवनेरी विकास आराखडा, (Pune News) ओतूर ग्रामीण रुग्णालय, मावळमधील लोणावळा उपजिल्हा रुग्णालय, कान्हे ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ प्रशासकीय इमारत, टाकवे, आंबी येथील मोठ्या पुलांची कामे, बांधकाम खेड तालुक्यात राजगुरू स्मारक विकास आराखडा केला.
शिरूर तालुक्यात जगप्रसिद्ध रांजणखळगे पर्यटन विकास आराखडा, ग्रामीण रुग्णालये यासह घोडनदीवरील पुलांचे बांधकाम करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. २०१६ ते २०१२ मध्ये प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम त्यांनी केले आहे. (Pune News) सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना पाटील यांनी महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात मोठे योगदान दिले आहे.
आर. वाय. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार सुनिल शेळके, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बी. एन. बहीर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी अखेर जाहीर! माजी नगरसेवकांना प्राधान्य