पुणे : पुण्यातील सगळ्यात जास्त वर्दळीचा रस्ता म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात ट्राफिक होते म्हणून चांदणी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारा पूल पाडण्यात आला आणि त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. नवीन पुलाचे उद्घाटन थाटात झाले. या पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा केला जात होता. परंतु हा पूल सुरु होऊनही या चौकातील वाहतूक कोंडी अद्याप सुटलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या पुलामुळे विरोधक टीका कतर आहेत.
चांदणी चौकातील कोणता रस्ता कुठे जातो, हे येथे सांगितले जाईल, अशा आशयाचे उपाहासात्मक संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पूल तयार करताना उड्डाणपूल आणि अंडरपास तयार केला गेला आहे. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम दूर होण्यास काही दिवस लागतील, असे लोकांना वाटत होते. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला होऊन महिना उलटला तरी वाहनचालकांचा गोंधळ सुरुच आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी चांदणी चौकातील पुलासंदर्भात शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला. त्यांना पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. पुण्यातील या वाहतूक कोंडीमुळे अनेक आयटी कंपन्या शहरबाहेर गेल्या आहेत. तसेच भविष्यात आणखी कंपन्या शहर सोडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच नहीने हा पूल तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. या ठिकाणी आठ रॅम्प, दोन सर्व्हिस रोड, दोन अंडरपास आणि चार पुलांसह १७ किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कायम असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना अक्षय भावसार हे स्थानिक नागरिक म्हणाले की, चांदणी चौकातील पूलावरून प्रवास करताना वाहनचालकांचा गोंधळ होतो. चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती होते.