Pune News : पुणे : पुण्यातील शिक्षण क्षेत्रातून घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट व त्यांच्या अंतर्गत येणार्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यात जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगरमधील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेत २०१८ पासून आतापर्यंत झाला आहे. (Embezzlement of more than 50 lakhs in Westren Maharashtra Education Trust in Pune)
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशिद खान (वय ४४, रा. नाना पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
तबस्सुम अन्वर शेख (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा. कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), नाजेमा साहेल खान (वय ४२), सोहेल इस्माईल खान (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा), असिन आरीक शेख (वय ३७), आरीफ शेख (वय ४०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune News)
विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यात जमा न करता केला अपहार
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्ट व त्या अंतर्गत येणार्या शैक्षणिक संस्थांचे कागदपत्रावर आरोपींनी खोट्या सह्या केल्या. विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यावर जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक केली. (Pune News) आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावाने बनावट व खोटी सही करुन संस्थेचे लेटरहेड वापरुन जव्वाद शेख या शिक्षकाची अनुदानित पदावर नेमणूक केली आहे. नाजेमा साहेल खान या सतत आजारी असून गैरहजर असताना ही शाळेच्या मस्टरवर एकत्रित सही करुन शासनाची फसवणूक केली. (Pune News) असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :