Pune News : पुणे : गणवेशाच्या आतही असतो, माणुसकीचा झरा, पोलीसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… या ओळी आपण वेळोवेळी वाचल्या असतील, ऐकल्याही असतील. नुकताच याचा प्रत्यय आला आहे. रस्ता चुकल्यामुळे भरकटलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीला पुण्यातील केशवनगर येथील पोलिसांनी अवघ्या दीड तासात तिच्या घरी अगदी सुखरुप सोडले. महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत संवेदनशील असल्याचे पुणे पोलिसांनी दाखवून दिले आहे.
केशवनगर पोलिसही झाले भावनिक!
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एमपीएससी विद्यार्थीनी दर्शना पवारच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली. त्यानंतर सदाशिव पेठेत भरदिवसा तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ला झाला. यामुळे नागरिकांच्या विशेषतः महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Pune News ) पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांमध्ये देखील एक माणूस लपलेला असतो, याचा प्रत्यय नुकताच पुणे पोलिसांच्या कामगिरीमुळे आला.
पुण्यातील केशवनगर परिसरात राहणारी सिमरन नावाची आठ वर्षांची चिमुकली घरातून एकटी बाहेर पडली. येथील जनसेवा बँकेजवळ गेल्यानंतर ती रस्ता चुकली. घरी जाण्याचा रस्ता सापडत नसल्याने सिमरन अस्वस्थ झाली. घाबरलेल्या सिमरनला रडू कोसळले. (Pune News ) लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून याच रस्त्यावरून प्रवास करणारे नीलकंठ मानिकशेट्टी सिमरनजवळ गेले. तिची विचारपूस केली. तिला नाव, पत्ता विचारला. मात्र, घाबरलेल्या सिमरनने कोणतीच माहिती दिली नाही. अखेर मानिकशेट्टी सिमरनला घेऊन केशवनगर पोलीस चौकीत गेले.
केशवनर पोलिसांनी बिथरलेल्या सिमरनला शांत केले. तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला काही प्रश्न विचारून घराचा पत्ता विचारला. स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून घराचा पत्ता शोधून काढला. (Pune News ) दीड तासात पोलिसांनी सिमरनची आई आणि आजी यांच्याशी भेट घडवली. हरवलेली सिमरन सुखरूप घरी परतल्याने आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आई-मुलीच्या भेट घडताच दोघींनी घट्ट मिठी मारली. पोलीस देखील या भेटीने भावनिक झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन ऊर्फ पुतुन मिथिलेश राय (वय ८) असे या मुलीचे नाव आहे. सिमरन आई आणि आजीसोबत केशवनगर येथे राहते. ती घरातून एकटीच बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकली. मानिकशेट्टी यांनी तिला पोलीस अंमलदार दीपक कदम यांच्या ताब्यात दिले. घाबरलेल्या सिमरनला स्वत:चे नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता.
कदम यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना दिली. ताम्हाणे यांनी कुटुंबीयांचा शोध घेण्याची सूचना दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, मुलीचे नाव सिमरन असून ती केशवनगर येथील नागपुरे चाळीत आई व आजी यांच्यासोबत राहत असल्याची माहिती मिळाली. (Pune News ) पोलिसांनी घरी जाऊन तिला आई आणि आजीच्या ताब्यात दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बिल्डरचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज केला लंपास