Pune News : पुणे : पुणे मेट्रोला पुणेकरांचा प्रतिसाद वाढत असल्याने स्टेशनवरील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येरवडा परिसरात मेट्रोचे कामांना वेग आला आहे. यातच गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथे एक भीषण अपघात झाला. काम सुरू असताना पुलावरून एक लोखंडी भाग खालून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर पडला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुदैवाने जीवितहानी नाही
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे ते पिंपरी चिंचवड अशा मोठ्या टप्प्यात मेट्रोचे काम पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाटामाटात या मार्गाचे उद्घाटन देखील केले. आता उर्वरित स्टेशनचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. (Pune News) हे काम सुरू असताना उड्डाणपुलाच्या खाली सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, अपघात होऊ नयेत, यासाठी पुरेशी काळजी घेतल्याचे दिसत नाही, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
दरम्यान, मेट्रोचे काम सुरू असताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने लोखंडी भाग खालून जाणाऱ्या कारवर पडला. हा लोखंडी भाग पादचारी अथवा दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. (Pune News) चारचाकीच्या बोनेटवर हा भाग पडल्यामुळे जीवितहानी टळली. मेट्रो सुरु करण्याच्या घाईपोटी नागरिकांना वेठीस धरले जात आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत बोलताना मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले की, येरवड्यात मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली. नेमकी कशामुळे ही घटना घडली, याची पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. (Pune News) सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ही घटना कशी घडली, याची माहिती चौकशीनंतर समोर येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भरधाव लॅम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; पुण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल
Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला खो ; भवितव्य अधांतरी!