Pune News : पुणे : लोहमार्गावरील अपघात, दरडी कोसळणे, देखभाल दुरूस्ती अशा अनेक कारणांमुळे रेल्वे खोळंबल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. पण चक्क झुरळांमुळे रेल्वे तब्बल दोन तास खोळंबल्याची घटना नुकतीच पुण्यात पाहायला मिळाली आहे.
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर पुढे रवाना
त्याचं झालं असं, पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुण्यावरून निघाली. मात्र, या रेल्वेमध्ये झुरळांचा मुक्त संचार होता. जिकडे-तिकडे झुरळे फीरत असल्यामुळे प्रवासी हैराण झाले. अखेर वैतागलेल्या प्रवाशांनी तब्बल दोन तास रेल्वे पुणे स्थानकावर थांबवली. पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.
अखेर रेल्वे प्रशासनाने संपूर्ण रेल्वेमध्ये पेस्ट कंट्रोल केले. त्यानंतरच प्रवाशांनी रोखून धरलेली पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली. या घटनेचा व्हिडीदेखील व्हायरल केला. या रेल्वेने प्रवास करणारे एक प्रवासी कैलास मंडलापुरे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पनवेल-नांदेड रेल्वे क्रमांक १७६१३ ने प्रवास करत आहोत. (Pune News) मी या रेल्वेच्या बी १ या एसी कोचमधून प्रवास करतोय. प्रवासादरम्यान, प्रवाशांच्या अंगावर झुरळं पडत आहेत. या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळं आहेत. ही झुरळांनी भरलेलेली ट्रेन आहे.
प्रवासी मंडलापुरे यांनी सांगितलं की, या ट्रेनमध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं, नवजात बाळंसुद्धा आहेत. सर्वांना या झुरळांनी हैराण केलं आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाकडे याबद्दल तक्रार करूनही रेल्वे प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही. (Pune News) सव्वा तासापासून ही रेल्वे पुणे स्थानकावर उभी आहे. दरम्यान, प्रवाशांनी आपली मागणी लावून धरल्यानंतर अखेर या रेल्वेत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. त्यानंतर दोन तासांनी ही ट्रेन नांदेडकडे रवाना करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक
Pune News : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ पुणे विमानतळावरील महिलेचा दावा; सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले!