Pune News : पुणे : रायगड जिल्ह्यातील इशाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. २२ जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, इशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.
रायगड येथील इशाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. (Pune News ) अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, इशाळवाडी हा भाग दरड प्रवण क्षेत्रात नव्हता. दरड कोसळल्याचे समजल्यानंतर साडेसात वाजेपर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. या दुर्घटनेत अनेकजण दगावले आहेत. जखमींवर पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Pune News ) हेलिकॉप्टरने छोटे मशिन पाठवायचे असल्यास ते एक टनापर्यंतच वजन उचलू शकते. हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही. त्यामुळे मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत. मात्र, दरड हटविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार असून, प्रशासन कामाला लागले आहे, अशी माहिती अजित पवारांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
दरम्यान, घटनास्थळी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मातीची ढिगारे उचलण्यासाठी ५०० ते ७०० माणसे पोहोचली असून, अजून काही माणसं पाठवली जात आहेत, अशी माहिती मिळत आहे. (Pune News ) ज्या गावात दरड कोसळली आहे तिथे चालत जावं लागतं. एनडीआरएफच्या टीमलाही तिथे जाताना त्रास होत आहे. मुख्यमंत्री, सर्व प्रशासकीय यंत्रणा याठिकाणी आहे. २२८ लोक येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे. एकूण ४८ कुटुंब येथे वास्तव्याला हेती, असे अजित पवार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण..
Pune News : खोदकामादरम्यान २१ वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू :