Pune News : पुणे ता. ०७ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी ॲड. संजय सावंत (पाटील) यांची आधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हा बॅकेच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या अधिकृतपणे निवड करण्यात आली.
बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी..
ॲड. संजय सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सञ न्यायालयात वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत. प्रामुख्याने फौजदारी, दिवाणी तसेच कौटुंबिक क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध न्यायालयात काम करत आलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत अनेक पिडीत महिलांना सुध्दा कायदे विषयक मदत त्यांनी केलेली आहे.
खरेदी – विक्री व बँक संदर्भातील सर्व प्रकारचे दस्तऐवज दुय्यम निंबधक यांच्या समोर नोंदवून घेणे. या सर्व सामाजिक व वकीली व्यवसायातील कामाची दखल घेऊन सर्व बँक संचालक कमिटीने ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांना पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पँनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे.
दरम्यान, बिगरशेती कर्ज विभागाचे कर्ज अधिक्षक शिवाजीराव नांगरे-पाटील यांनी आधिकृत पञ जाहिर केल्यानंतर पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ०५) ॲड. संजय सावंत यांना पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे आदी मान्यवर उपस्थित होते.