Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात मृत रोहनच्या घरची परिस्थिती पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गहिवरले; नवीन घर बांधून देण्याचे दिले आश्वासन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 7 November 2025, 17:19
Pune News: Deputy Chief Minister Eknath Shinde was shocked to see the condition of the house of Rohan, who died in a leopard attack; promised to build a new house

Pune Prime News

पुणे: बिबटयाच्या हल्ल्यात तेरा वर्षीय (Pune News) रोहन विलास बोंबे या मुलाचा (Eknath Shinde) रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पीडित घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रोहनचे वडील विलास आणि कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी रोहनच्या घरची बिकट परिस्थिती पाहून त्यांना नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले.

 

जुन्नर वनविभागात बिबटयाच्या हल्ल्यात आजपर्यंत 55 अधिक लोकांचा बळी गेला आहे. तसेच पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. पिंपरखेड आणि परिसरातील ही तिसरी घटना होती त्यामुळे या परिसरातील लोक खूप आक्रमक झाले होते आणि त्यांनी उग्र आंदोलन केले. ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले गेले तसेच या भागातील 500 ते 700 बिबटे टप्प्याटप्प्याने वनताराला पाठवण्याचा निर्णय झाला आहे आणि बिबट कैद करण्यासाठी जवळपास 11 कोटीचा निधी मंजूर झाला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल हेलिकॉप्टरने पिंपरखेड येथे आगमन झाले. रोहनच्या घराकडे जायला रस्ताही नसल्याने ते पीडित कुटुंबाच्या घरी चालत गेले. यावेळी त्यांनी रोहनचे वडील विलास बोंबे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आपुलकीने विचारपूस केली आणि सांत्वन केले. यावेळी देवदत्त निकम यांनी सर्व परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली. यावेळी रोहनचे वडील विलास बोंबे यांनी विनवणी केली की साहेब माझा रोहन अभ्यासात हुशार होता. रोहनच्या बाबतीत जशी घटना घडली अशी इथून पुढे कोणाच्या बाबतीत घडू नये. यावेळी मागील आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्या शिवण्या तिचे आई आणि वडील उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की इथून पुढे या भागात बिबट्याचा हल्ला होणार नाही यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिले. रस्त्याची अवस्था बघून त्यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना पानंद रस्त्यांच्या प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा आदेश दिला. यावेळी विलास बोंबे यांचे घरचची एकंदरीत परिस्थिती पाहून एकनाथ शिंदे यांना गहिवरून आले त्यांनी या कुटुंबाला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले दोन दिवसात माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल असे सांगून आश्वस्त केले.

परिसरातील ग्रामस्थांनी वाढत्या बिबट्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली.त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,“राज्य सरकार या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पावले उचलली जातील”. या वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, जिल्हा प्रमुख देविदास दरेकर, माजी आमदार पोपटराव गावडे, देवदत्त निकम, सचिन बांगर, रमेश येवले, रविंद्र वळसे पाटील, उपसरपंच विकास वरे, नरेश ढोमे तसेच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post
Dhananjay Munde: Did I set up a mobile phone factory? Dhananjay Munde's response to Manoj Jarange's allegations, demands CBI inquiry...

Dhananjay Munde: मी काय मोबाईलची फॅक्टरी लावलीये का? मनोज जरांगेंच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर, सीबीआय चौकशीची मागणी…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.