Pune News पुणे : दर्शना पवार मृत्युप्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune News) राजगडावर ट्रेकिंगला जाताना दोघे गेले होते तर परत येताना ”तो” एकटाच आल्याचे दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त एका टीव्ही चॅनल ने आपल्या बातमीत दिले आहे. (Pune News) यामुळे त्या मित्रानेच असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Pune News)
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) यांचा मृतदेह राजगड किल्यावरील (ता. वेल्हे) सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. तपासादरम्यान CCTV फुटेजमधुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बातमी दर्शना ही त्याचा मित्र राहुल हांडोरे याच्या सोबत ट्रेकिंगला गेले होते. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना आणि राहुल दोघेही १२ जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण ६ वाजून १५ मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर १० वाजण्याच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केले नसल्याचे घरच्यांना सांगितले आहे.
दर्शना पवारने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (MPSC) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (RFO) पोस्ट मिळवली होती. त्यामुळे तिचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार स्वीकारण्यासाठी दर्शना पुण्यात आली होती. त्यामुळे ती नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे थांबली होती.
पुण्यात दोन, तीन ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर ती मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगून सिंहगडावर आणि राजगडावर ट्रेंकिगला गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी सगळीकडे चौकशी केली. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली होती.