Pune News लोणी काळभोर, (पुणे) : न्यायपालिका, प्रशासन, विधिमंडळ आणि प्रसार माध्यमे हे लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. हा चार चाकांचा रथ हाकण्यासाठी प्रसार माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे. Pune News हा वाटा उचलण्यासाठी दैनिक ”पुणे प्राईम न्यूज” आजपासून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात सहभागी झाले आहे. या दैनिकाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची वेळीच दखल घेऊन त्यांना योग्य न्याय दिला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला. (Pune News)
‘पुणे प्राईम न्यूज’ दैनिकाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठात शनिवारी (ता. २२) मोठ्या दिमाखात ‘पुणे प्राईम न्यूज’ या दैनिकाचे उद्घाटन मंगेश चिवटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांनी वृत्तपत्राचे अनावरण केले.
याप्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, ‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, पोलीस उपनिरीक्षिक शिवाजी ननवरे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच संतोष कांचन, उद्योजक शंकर गायकवाड, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, रेनबो स्कूलचे नितीन काळभोर, उद्योजक देवीदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मंगेश चिवटे यांनी, राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून झालेल्या मदतीचा आढावा घेतला. पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न मांडून, सहायता कक्षाच्या माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन सर्व पत्रकारांना दिले. नव्याने सुरु झालेल्या ‘पुणे प्राईम न्यूज’ या दैनिकाला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी विचार मांडताना विलास बडे म्हणाले की, सध्या ग्रामीण भागातील पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे. माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तेव्हाच या स्पर्धेच्या युगात ते तग धरू शकतील. पत्रकारिता खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण भागातील पत्रकारच करत आहेत, असेही बडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या हस्ते मंगेश चिवटे यांना आरोग्यदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना ‘असामान्य कर्तृत्व’ हा पुरस्कार मंगेश चिवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रिंट व डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष सुनील जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, विजय काळभोर, तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, तुकाराम गोडसे, सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, जितेंद्र आव्हाळे, श्रीनिवास पाटील, जयदीप जाधव, सचिन माथेफोड, गौरव कवडे, विशाल कदम, रियाज शेख, सुखदेव भोरडे, निलेश हांडे, शहाजी नगरे, अमोल भोसले, भाऊसाहेब महाडिक, गोरख कामठे, राजेश धिवर, हनुमंत चिकणे, राजेंद्र हजगुडे, सुनील तुपे, सुधीर कांबळे, सोहम जगताप, पुणे जिल्ह्यातील पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक युनूस तांबोळी, लक्ष्मण दांडगे, हनुमंत चिकणे, राहुलकुमार अवचट, सागर जगदाळे, दीपक खिलारे, सागर घरत, गणेश सुळ, महेश सूर्यवंशी, संदीप टूले, जीवन शेंडगे, राजेंद्रकुमार शेळके, अक्षय भोरडे आदींसह पुणे व सातारा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर आभार हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडके यांनी मानले.