Pune News : पुणे : टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का? तुला मेणबत्तीचे चटके देईन… आणि यातलं काहीच घरच्यांना सांगायचं नाही… अशा भाषेत शाळेतील एका तीन वर्षीय चिमुरडीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या नराधम शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात असा प्रकार घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या पालकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी यांची तीन वर्षांची मुलगी कोथरूड परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. (Pune News) मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात आपल्या वडिलांकडे तक्रार केली. मुलीने मस्ती केल्यामुळे शिक्षिकेने शिक्षा दिली असेल, असे प्रथमदर्शनी पालकांना वाटले. मात्र, त्यानंतर मुलीने जे काही सांगितले, ते धक्कादायक होते.
मुलगी आपल्या वडिलांना म्हणाली की, ”पप्पा, आमच्या अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन… घरच्यांना यातले काहीच सांगायचे नाही, असे म्हणतात…” मुलीच्या या तक्रारीनंतर पालकांनाही धक्का बसला. (Pune News) त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत संबंधित महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात ४० वर्षीय शिक्षिकेविरोधात भारतीय दंड विधान ३२३, ५०६, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अनंतराव पवार महाविद्यालयास नॅक मानांकनाची ‘अ’ श्रेणी प्राप्त
Pune News : व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक; पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे मत