Pune News : पुणे : पुणे शहरातील हॉस्पिटलपैकी नामांकित समजल्या जाणाऱ्या ग्रॅंट मेडिकल फाउंडेशनच्या रूबी हॉल हॉस्पिटलने मूळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी उत्पन्न दाखवून थेट सह धर्मादाय आयुक्तांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रूबी हॉल क्लिनिक हे धर्मादाय हॉस्पिटल असून, महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के रक्कम ही गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, येथे गरिब रुग्णांसाठीच्या इंडिजंट पेशंट फंडमध्ये अफरातफर झाली आहे. शिवाय गरीब रुग्णांना निधीच शिल्लक नाही, असे सांगून परत पाठवले जात असल्याचे नादर्शनास आले आहे. याबाबत अनेक नातेवाईकांनी आरोप केला असून, तक्रारही केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
इंडिजंट पेशंट फंडमध्ये अफरातफर
रूबी हॉल क्लिनिक हे धर्मादाय हॉस्पिटल असून, दर महिन्याला उत्पनाची माहिती धर्मादाय विभागाला द्यावी लागते. मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिलेल्या आदेशानुसार रूबी हॉलने महिन्याला झालेल्या एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे; मात्र, हॉस्पीटलचे उत्पन्न कमी दाखवून, येथे रुग्णांची परवड करण्यात आली आहे. (Pune News) एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या आदेशालाच बगल देण्या आली आहे, असा आरोप होत आहे.
रूबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाबाबत धर्मादाय विभागाला अहवाल सादर केला जातो. मात्र, २०१९ पासून अहवालांची पडताळणी केली असता, खोटी माहिती दिल्याचे धर्मादाय सह आयुक्त सुधीर कुमार बुक्के यांच्या निदर्शनास आले आहे. (Pune News) गरीब रुग्णांसाठी निधी खर्च करावा लागू नये आणि तो निधी लाटता यावा, यासाठी रुग्णालयाने शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न असूनही प्रत्यक्षात खूप कमी उत्पन्न असल्याचा अहवाल सादर केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुक्के यांनी हॉस्पिटलला नोटीस पाठवली आहे.
पिवळं आणि केशरी रेशन कार्डधारकांना येथे मोफत सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यामध्ये एजंटच रॅकेट देखील सक्रीय आहे. हे एजंट टक्केवारी घेऊन फाईल आयपीएफमध्ये बसवत आहेत. (Pune News) मॅनेजमेंटच्या लेकांची याला साथ आहे. रूग्णालयातील बिलिंग विभागातील मनोजकुमार श्रीवास्तव या पदाधिकाऱ्यांचे नाव देखील याप्रकरणी समोर येत आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी येथे किडनी प्रत्यारोपण रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर आता गरीब रुग्णांचा इंडिजंट पेशंट फंड (आयपीएफ फंड) लाटण्याचा प्रयत्न केला गेला. (Pune News) हा प्रकार म्हणजे एकप्रकारे गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे आहे, असा आरोप होत आहे. कोट्यवधींचा गैरव्यवहार असणाऱ्या या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बुधवार पेठेत अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ बांगलादेशी महिलांसह दोघांना अटक