Pune News : पुणे: कंपनीच्या व्यवहारात 10 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याप्रकरणी विवेक अनिल गोरटमारे (वय 29 रा. चाकण) यांनी मंगळवारी (दि.20) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर लहू ढेरे (वय 32 रा.खेड) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार चाकण येथील शाडोफॅक्स टेक्नोलॉजीस्ट प्रा.लि. या कंपनीत येथे 1 एप्रिल 2022 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाडोफॅक्स टेक्नोलॉजीस्ट प्रा.लि. या कंपनीतील चाकणच्या शाखेत काम करत होता.(Pune News) त्याने सहा महिन्यात कंपनीच्या व्यवहरात 10 लाख 6 हजार 796 रुपयांचा गैरव्यवहार केला. कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपी विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एसटी विरोधात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन; सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी
Pune News : बिबट्यांमधील भांडणामध्ये एका नर बिबट्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना