Pune News : पुणे : शहरातील एका कन्स्ट्रक्शन कंपनीने भाड्याने घेतलेल्या सामानाची परस्पर विक्री करुन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या प्रोजेक्ट डायरेक्टरसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रोजेक्ट डायरेक्टरसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चढ्या दराने वर्क ऑर्डरला मंजुरी देऊन कमीशन घेणाऱ्या स्ट्रक्चरल जनरल मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान खराडी येथील एआयजीपी, आयटीपीपी प्रोजेक्ट तसेच वेक्टर प्रोजेक्ट, प्रतिक कलेक्शन येथील एल अँड डब्ल्यु कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात घडला आहे. (Pune News) याप्रकरणी एल अँड डब्ल्यू कंन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.चे जनरल मॅनेजर सिक्युरिटी राहुल सुबीर बॅनर्जी (वय ४६, रा. ग्रीन वर्ल्ड को ऑप सोसायटी, कालवा, ठाणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रोजेक्ट डायरेक्टर विजयकुमार माथनकुमार, जनरल मॅनेजर स्ट्रक्चरल बसवराज चन्नागी यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे एल अँड डब्ल्यु कंन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. येथे जनरल मॅनेजर सेक्युरीटी या पदावर कार्यरत आहेत. तर आरोपी विजयकुमार माथनकुमार कंपनीत प्रोजेक्ट डायरेक्टर या पदावर काम करत होते. कंपनीने कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी लागणारे साहित्य भाड्याने घेतले आहे. (Pune News) या वेळी आरोपीने इतर दोघांच्या मदतीने या साहित्याची परस्पर विक्री करुन कंपनीची १ कोटी ३४ लाख ७८ हजार १६४ रुपयांची फसवणूक केली. तसेच कंपनीला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पुरवणाऱ्या व्हेंडर, सब कॉन्ट्रॅक्टर यांची बिले मंजूर करुन मोठ्या प्रमाणात कमीशन घेऊन कंपनीचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, या कंपनीत बसवराज चन्नागी हे जनरल मॅनेजर स्ट्रक्चरल या पदावर काम करत होते. त्यांनी कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे काम न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.व टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि. या रजिस्टर व्हेंटर यांच्या वर्क ऑर्डरला चढ्या दराने मंजुरी दिली. त्या मोबदल्यात चन्नागी यांनी कमीशन म्हणून बी.सी. कन्सल्टंट या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मच्या बँक खात्यात ४७ लाख ९ हजार ५६१ रुपयांचे कमीशन स्वीकारून कंपनीची फसवणूक केली. (Pune News) पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अटकेतील उबाळे टोळीविरोधात अजून एक गुन्हा दाखल
Pune News : वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत परिसंवाद; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी
Pune News : बहिणीला छेडल्याच्या रागाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार; आरोपीसह ६ साथीदारांवर ‘मोक्का’