Pune News : पुणे : रितेश कुमार यांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडून पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यावर भर दिला आहे. अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ५० गुंड टोळ्यांविरुद्ध यशस्वीरित्या मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शहरात फोफावणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे शक्य होणार आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीला बसणार चाप!
एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धानोरीतील गुंड अभिषेक उर्फ अभि रमेश तांबे याच्यासह दोन साथीदारांविरुद्ध (Pune News पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत. अभिषेक तांबे (वय २१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), सुमीत नागेश लंगडे (वय २५, रा. बर्माशेल, इंदिरानगर, लोहगाव रस्ता), प्रज्वल प्रशांत शिंदे (वय १८, रा. तिरुपती एनक्लेव्ह, धानोरी रस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक कांचन जाधव, रवींद्रकुमार वारंगुळे, सचिन माळी, सचिन शिंदे आदींनी तांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची पडताळणी (Pune News ) अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त संजय पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे महापालिका ते भोसरी आता नॉन स्टॉप बस; प्रवाशांना मिळणार जलद सेवा!