विशाल कदम
Pune News | लोणी काळभोर, (पुणे) : मागील काही दिवसांपासून शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीने हैरान केलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी व वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून अटक केली आहे तर एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.
सुरेश बाबुदास वैष्णव (वय – २७ रा. शिवशंभोनगर, कोंढवा रोड, कात्रज, पुणे) अजिंक्य श्रावण आहिरे (वय- १९ रा. मंडई दगडुशेठ गणपती समोर पुणे) ज्ञानेश्वर रमेश शिंदे (वय १८ रा. हनुमान मंदिराचे पाठिमागे माळवाडी, हडपसर ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ मोटारसायकल व मोबाईल फोन असा तब्बल ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबी बु गावाच्या हद्दीतून बुधवारी (ता. १७) राहत्या घरासमोरून दुचाकी, २ मोबाईल फोन, चोरी गेल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रामजुगुन चौहान मुळ रा सोहिला पो. मस्कवना राज्य उत्तरप्रदेश यांनी फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून व तांत्रिक माहीतीचे आधारे सदर मोटारसायकल ही कोंढवा बु।। येथील गोकुळनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच संशयीत इसम सुरेश वैष्णव याला ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हयातील मोटारसायकल ही त्याचे साथीदार अजिंक्य आहिरे, ज्ञानेश्वर रमेश शिंदे व विधीसंघर्ष बालक यांचेसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
७ मोटारसायकल , मोबाईल असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त…
दरम्यान, सदर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वडगाव निंबाळकर, कोंढवा, हडपसर, लोणीकंद, लोणी काळभोर, या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. ७ मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार अनिल खेडकर, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, अनिल दनाने, हिरामन खोमणे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, तुषार जैनक, बाळासाहेब कारंडे, राजु मोमिन होमगार्ड दादा कुंभार यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास हवालदार राहुल भाग्यवंत हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ