Pune News | पुणे : देशात ऐकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असताना दुसरीकडे अद्यापही काही प्रथा, परंपरा अथाव सवयी आणि मानसिकता बदलू शकलो नाहीत. याचे ताजे उदाहण समोर आले आहे. बालविवाह प्रथा मोडीत काढावी यासाठी समाज सुधारकांनी मोठा लढा दिला. मात्र तरीही 23 व्या दशाकात सुध्दा बाल विवाह राजरोजपण होत आहेत. असे असतानाही सुसंस्कृत पुण्यात बाल विवाह रोखण्यात एका व्यक्तीमुळे यश आले आहे.
सुसंस्कृत पुण्यात बाल विवाह रोखण्यात एका व्यक्तीमुळे यश…
माजी सदस्य बालन्याय मंडळ सदस्या मनीषा पगडे यांनी दूरध्वनीवरुन पुण्यातील बाल कल्याण समितीला वानवडी भागातील एका अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह होणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार संबंधित विभागाने आणि पोलिसांनी तत्पर कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेचा जन्म दाखला प्राप्त झाला होता. त्यावरुन ती मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्षा डॉ राणी खेडीकर व सदस्य आनंद शिंदे एडवोकेट पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड व शामलता राव यांनी वानवडी पोलिस स्टेशन ृला संपर्क करून सदर बाबतीत माहिती दिली.
वानवडी पोलिसांनी त्वरित बालिकेस ताब्यात घेतले. व्हिडिओ कॉल व्दारे अध्यक्षा व सदस्य यांनी बालिका, तिची आजी आणि काका यांच्याशी संवाद साधला, बालीकेची आई बालिका एक वर्षाची असतानाच वारली असून, तिच्या वडिलांना फिट्स येतात. बालिकेची आजी भिक्षा मागून बालिकेचा सांभाळ करते. बालिकेचा विवाह एक ते दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी ठरवण्यात आला होता. अशी माहिती समोर आली.
अशा परिस्थितीत बालिका ही काळजी व संरक्षण अंतर्गत येत असल्याकारणाने बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर सदस्य आनंद शिंदे, वैशाली गायकवाड, श्यामलाता राव, पूर्वी जाधव यांनी चर्चा करून बालिकेला एका संस्थेत सुरक्षित केले आहे. बालिकेचे पुनर्वसन हेतू ठोस निर्णय समिती कडून घेतले जातील. असे सांगण्यात आले.
पगडे , बाल कल्याण समिती पुणे भाग एक आणि वानवडी पोलिस स्टेशन यांच्या तत्परतेने हा बाल विवाह थांबवण्यात यश आले.
भविष्यात बालविवाह रोखण्यासाठी व माहितीसाठी बालकल्याण समितीाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune : ओशो आश्रम वाद ! आश्रमाच्या परिसरात गोंधळ घालणार्या तब्बल 130 अनुयायांच्याविरूध्द गुन्हा दाखल
Pune Crime | भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याला लुटले
Pune Crime | पुणे : तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु घालून लुटले