Pune News : पुणे : भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या दत्तनगर चौक ते संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
तात्पुरते आदेश निर्गमित
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास (Pune News) पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ११ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : संभाजी भिडे पुन्हा वादात ! काँग्रेसकडून निषेध
Pune News : पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश