Pune News : पुणे : जुन्नरच्या दोन सुपुत्रांची ‘चांद्रयान-३’ मोहिमेत महत्त्वाची व अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीमुळे जुन्नरच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे असे या मोहिमेत योगदान दिलेल्या राजुरी (ता. जुन्नर) गावातील दोन सुपुत्रांची नावे आहेत.
जुन्नरच्या शीरपेचात मानाचा तुरा
भारताच्या ‘चांद्रयान-3’ या महत्त्वाकांक्षी मिशनने आज आकाशात यशस्वी उड्डाण केलं. भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. (Pune News) आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या.
असिफभाई महालदार हे उद्योजक आहे. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी सहा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील राजुरीत राहतात. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. (Pune News) ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा स्थापित करण्यात आली होती.
मयुरेश शेटे हे सुद्धा राजुरी गावरील असून इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. (Pune News) या चांद्रयान मोहिमेत त्यांचाही मोठा सहभाग आहेत. सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात. त्यांनीदेखील मोठी मेहनत करत चांद्रयान-3 या मोहिमेत सहभाग घेतला होता.
दरम्यान, भारतासाठी अभिमानास्पद क्षण होता. सर्व भारतीयांचे या मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावरदेखील या मोहिमेची चर्चा झाली. (Pune News) या पूर्वी झालेलं उड्डाण अपयशी ठरल्यामुळे या उड्डाणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या दोघांच्या कामगिरीमुळे जुन्नरकरांची मान उंचावली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने केले दोघांचे फोटो व्हायरल ; पुण्यातील घटना..