Pune News : पुणे : विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, या घोषणांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या प्रसंगावरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी संतप्त झाले असून, त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संतप्त झालेले राजू शेट्टी म्हणाले, की “सरकार गतिमान आणि वेगवान असल्याचं सोंग करतंय. परंतु शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळेना, उसाचा अंतिम हप्ता ठरेना, प्रोत्साहनपर अनुदानाचा तर मेळच लागेना. म्हणूनच सांगतो शेतकऱ्यांनो, कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला तुम्हाला यायला लागतंय!!”, असं ट्विट राजू शेट्टी यांनी केलं आहे. (Can’t get crop insurance, sugarcane installment is not settled… I have to come to ask questions… Raju Shetty’s criticism!)
सरकार गतिमान आणि वेगवान असल्याचं सोंग करतंय
२०२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजनांसाठी निधीची तरतूद केली. तसेच शेतकरी सन्मान योजनेचा निधी वाढवला, पीक विमा एक रुपयात सुरू केला. (Pune News) अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असल्याची जाहिरातही सरकारकडून केली जातेय. परंतु प्रत्यक्षात हे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर येत आहे.
यासंदर्भात राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदनही दिले. राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. (Pune News) सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्याची मागणी केलेली आहे, असं या वेळी राजू शेट्टी म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी खडसावले; म्हणाल्या, मला संसदरत्न….
Pune News : येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर पोलिसांची कारवाई
Pune News : आनंदाची बातमी! मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री; ‘या’ भागात पावसाची हजेरी