Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीकडून बुधवारी (ता. ३०) जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीएमपीकडून दैनंदिन एक हजार ८३७ गाड्यांद्वारे सेवा दिली जाते. त्यामध्ये ९६ जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी १ हजार ९३३ गाड्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.
चालक, वाहक तसेच पर्यवेक्षकीय सेवकांची साप्ताहिक सुटी रद्द
रक्षाबंधन सणानिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पीएमपी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगाव, राजगुरूनगर (Pune News) आणि देहूगाव या भागांत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी चालक, वाहक तसेच पर्यवेक्षकीय सेवकांची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, अधिकारी, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांचीही प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकांवर आणि थांब्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी रांग लावायची गरज नाही
Pune News : पुण्यात पकडला तब्बल ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा