Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता तर गुन्हेगारीची हद्दच झाली. दिल्लीहून विमानाने पुण्यात येऊन दोघांनी घरफोडी केली. याप्रकरणी दोन चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून एक लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
कोंढवा पोलिसांची कामगिरी
१३ जुलै रोजी व्यावसायिकाच्या घरातून आरोपींनी सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गोकुळनगर भागात रिझवान आमि इकरार संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. (Pune News) रखवालदार नसलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन ते पाहणी करत असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलिसांनी योग्य संधी साधत दोघांनाही अटक केली आहे.
रिझवान अजमत अली (वय ३२, रा. लिबासपुर, दिल्ली) आणि इकरार नसीर अहमद (वय २७, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यावसायिक कोंढव्यातील क्रांती चौक परिसरात वास्तव्याला आहे.
याबाबत पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनीही घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. (Pune News) आरोपींनी चोरलेला ऐवज दिल्लीतील घरात लपवून ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. रिझवान सराइत गुन्हेगार आहे.
दरम्यान, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, ज्योतीबा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अनिल बनकर यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता ग्रामीण भागांतही धावणार लाइट मेट्रो?; वाहतूक कोंडींतून मुक्ती मिळणार!