Pune News : पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप हॉटेल मालकाच्या कन्येने तिच्या पतीवर केली आहे. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने केला आहे. तसेच, लग्नाआधी त्यानं बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलेने केला आहे. ही घटना समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. जून 2018 ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.(Pune News) त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), अभिजित विनायकराव जाधव (वय 40), विनायकराव जाधव (वय 65), वैशाली विनायकराव जाधव (वय 60) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती विश्वजीत याने फिर्यादीला 2018 मध्ये घोले रोड येथील राहत्या घरी नेले आणि दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. (Pune News) इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. फिर्यादीच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. तसेच फिर्यादी यांचे एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार फिर्यादी आणि त्यांचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सैन्यदलामध्ये असल्याचे भासवून फसवणूक; एक ताब्यात; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी!