Pune News : पुणे : एआयटी आर्ट, डिजाईन व टॅक्नॉलॉजी विद्यापीठाच्या महाराष्ट्र ऍकेडमी फॉर नॅवल एज्युकेशन व ट्रेनिंग(मॅनेट)च्या वतीने जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे शनिवारी (ता.७ नोव्हेंबर) जागरूकता अभियान आयोजित केले आहे.
जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक राहणार उपस्थित
“मॅनेट’ ही सागरी तंत्रशिक्षण(मर्चेंट नेव्ही) कौशल्य संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य करत आहे. “मॅनेट’च्या या बहुचर्चित कार्यक्रमासाठी पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, शिपिंग विभागाचे महासंचालक श्याम जगन्नाथ, (Pune News )पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मर्चंट नेव्हीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे. (Pune News ) सागरी सप्ताहाच्या निमित्ताने यावेळी प्रबोधन रॅली काढण्यात येणार असून त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्रामसेविकेला मारहाण करून नोटीस फाडली; महिलेला २५ हजार रुपये दंडासह एक वर्ष सक्तमजुरी
Pune News : पुणे जिल्ह्यात जुन्या-नव्या ३८८ ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; जोरदार मोर्चेबांधणी