Pune News : पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे दरवर्षी सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी बुधवारी (ता. २०) पहाटे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हजारो महिला भाविक या कार्यक्रमात सहभागी होत असल्यामुळे पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर चौक बुधवारी पहाटे वाहतुकीस बंद राहणार आहे. कार्यक्रम संपेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर चौक हा रस्ता बुधवारी पहाटे वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा, जिजामाता चौक, तसेच डावीकडे वळून गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजी बाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक, महाराणा प्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक, उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौकमार्गे पुन्हा शिवाजी रस्त्यावर येऊन स्वारगेटकडे जावे. (Pune News) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, फुटका बुरुज मार्गे गाडगीळ पुतळा चौक, उजवीकडे वळून जिजामाता चौकातून डावीकडे वळून पुढे जावे.
विजय मारुती चौक, सोन्यामारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून डावीकडे वळावे, (Pune News) मिर्झा गालीब रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून मंडईतून डावीकडे वळून शिवाजी रोडने पुढे जावे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी
Pune News : येरवड्यात बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशाचा मोबाईल व खिशातील रोकड लंपास; दोघांना अटक