Pune News : पुणे : पावसाचे यावर्षी उशिराने आगमन झाले. त्यानंतर काही दिवस तो चांगलाच बरसला. मात्र, ऑगस्ट महिन्यात त्याने सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नद्या-नाले कोरडे पडले. बळीराजासमोर पाण्याची गंभीर समस्या उभी राहिली. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. अखेर तो पुन्हा बरसला. हुलकावणी देणारा यावर्षीचा पाऊस आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्याचा परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. पण परतीच्या प्रवासात तो काही भागांमध्ये चांगलाच कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती
वर्षानुवर्षे हंगामात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस होतो. यंदा मात्र, ‘एल निनो’चा प्रभाव असतानाही सरासरी ८२० मिमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. अरबी समुद्रात सध्या चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Pune News) विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पण येत्या २४ तासांत समुद्रातील चक्रिवादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात तसेच पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. (Pune News) त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होणार असून पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रातून जमिनीपर्यंत आल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की १ जून ते ३० सप्टेंबर हा मोसमी पावसाचा कालखंड आहे. यंदा या कालखंडातील पाऊस सामान्य राहिला. या काळात देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ८२० मिमी पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ९४.४ टक्के आहे. सरासरीच्या ५.६ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र, सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के प्रमाण ‘सामान्य’ धरले जाते. त्यामुळे यंदा मोसमी पर्जन्यमान देशभरात सामान्य राहिले. प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाला होता. (Pune News) त्यामुळे यंदा देशात कमी पर्जन्यमानाचा अंदाज होता. त्यामुळे जूनमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला; देशाच्या बहुतेक भागांत मोठा खंड पडला. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत सरासरी भरून काढली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप
Pune News : महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करण्याचे आमिष दाखवून फसवणूक!
Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार