Pune News : पुणे : मुळशी तालुक्यातील सुर्वेवाडी येथील एका शेतकाऱ्याने जमीन नावावर करून न दिल्यामुळे हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई व त्याच्या साथीदारांनी मिळून तलवारीसह लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी देसाई याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला.
सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी दिला आदेश
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Pune News ) त्यावरून धनंजय देसाई व त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर देसाई याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
दरम्यान, जामीन मिळण्यासाठी देसाईने पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. (Pune News ) सरकारी पक्षातर्फे ऍड. विलास घोगरे पाटील यांनी, तर फिर्यादीतर्फे अॅड. अमेय बलकवडे, अॅड. सतिश कांबळे, अॅड. सूरज शिंदे आणि अॅड. ऋषिकेश कडू यांनी बाजू मांडली.
जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा १७ प्रकारचे गुन्हे हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. (Pune News ) गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात दहीहंडी पहायला जाताय? शहरातील वाहतूकीत झालेले बदल नक्की जाणून घ्या!
Pune News : … तरच ते उपोषण सोडायला तयार होतील; मनोज जरांगे पाटलांच्या पत्नीची प्रतिक्रीया