जीवन सोनवणे
Pune News : खंडाळा : पारगाव खंडाळा बसस्थानक परिसरात वारंवार अपघात होत असून, ते रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने गतिरोधक तयार केले. मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा पुनर्विकास चालू आहे, तर यामुळे वाहनचालक भरधाव वाहने चालवत आहेत.
शिवाय रस्त्यालगतचे दिवेही बंद…
वेगावर प्रतिबंध राहत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत म्हणून गतिरोधकांची निर्मिती केली आहे. पण गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने आता वाहन आपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. गतिरोधक लावले गेले परंतु, हे गतिरोधक अपघात टाळण्यासाठी लावले आहेत, की ते होण्यासाठी लावले आहेत, हेच समजेनासे झाले आहे. या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. शिवाय रस्त्यालगतचे दिवेही बंद असल्याने रात्री गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत.
खंडाळ्यातील सेवा रस्ता ते बसस्थानक या परिसरातील गतिरोधक रिफ्लेक्टर आणि पांढन्या पट्ट्यांविना धोकादायक ठरत आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रुग्ण, विद्यार्थी या सेवांचा लाभ घेण्यासाठी या मार्गाने सतत ये- जा करत असतात. त्यामुळे वाहनांची या मार्गावरुन नेहमीच वर्दळ असते. सदरच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारण्यात आल्याने ते वाहन चालकांना अनेकवेळा दिसून येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून हा पश्न वेळीच मार्गी लावावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.