Pune News : पुणे : पुणे शहरातील कर्वे रोडवरील मेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध होत आहे अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखा पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.
नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था
रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना:
बँक ऑफ महाराष्ट्र समोर १० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे. (Pune News ) भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी येथे १५ मीटर चारचाकी पार्किंग आणि युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी येथे २० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे.
सिद्धेश्वर मेडीकल ते कोहीनूर वाईन्स पर्यंत सोसायटी गेट सोडून तसेच गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्ड वेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्कींग करण्यात येत आहे.
स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना
कल्याण ज्वेलर्स शेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो-कलर्स दुकान पर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर शोरुम पर्यंत (Pune News ) ५० मीटर दुचाकी पार्किंग तर भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ पर्यत २० मिटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे.
वाहनचालकांनी पार्किंगच्या बदलाची नोंद घेवून आपली वाहने पार्किंग करावीत, असे आवाहनही वाहतुक शाखा, पुणे शहर यांच्या मार्फत केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं…
Pune News : तळजाई परिसरात पार्क केलेल्या ४० हून अधिक गाड्या गुंडांनी फोडल्या..
Pune News : ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन तरुणांनी केले पाहिजे : ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे