Pune News : हडपसर : फायनान्सच्या गाड्या कमी किमतीत देतो म्हणून हडपसरमधील युवकांना फसविल्याबाबत अटकेत असलेल्या उबाळे टोळीच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात अजून एक फसणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने, मोठी खळबळ उडाली आहे.
अन्यायग्रस्तांनी तक्रार देण्याचे पोलिसांचे आवाहन
उबाळे टोळीतील मुख्य आरोपी प्रफुल्ल उबाळे, त्याची आई कमल उबाळे, सहकारी सुभाष रसाळ आणि वाहन चालक अविनाश कदम या चौघांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, ते त्या गुन्ह्यात तुरुंगात होते. (Pune News) बुधवारी (ता. २३) गणेश नामदेव कोरे (रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी या टोळीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पहिल्या गुन्हातून जामीन झाल्यावर त्यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तानुसार, गणेश कोरे व त्याचा व्यवसायातील भागीदार प्रदीप मोरे यांचा हडपसर येथे केटरिंग व्यवसाय आहे. भविष्यात त्यांना जुन्या वाहनांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा विचार होता. त्यामुळे ते याविषयी माहिती घेत होते. त्यावेळी त्यांचा लहानपणीचा मित्र अनिरुद्ध राऊत याने त्याच्या ओळखीच्या प्रफुल्ल उबाळे नामक व्यक्तीकडे बुलेट गाडी विक्रीसाठी असल्याची माहिती दिली. कोरे यांच्या काकांना देखील बुलेट घ्यायची असल्याने त्यांनी ६५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने अनिरुद्धच्या खात्यावर जमा केले तर अनिरुद्धने ती रक्कम उबाळे यांच्या खात्यावर पाठवली. (Pune News) परंतु पुढील आठवडा उबाळे यांनी बुलेट द्यायला टाळाटाळ केल्याने कोरे व त्यांचे काका यांनी उबाळेची भेट घेतली. त्यावेळी उबाळे याने त्यांची रक्कम त्वरित माघारी केल्याने यांना उबाळेवर विश्वास निर्माण झाला. तसेच उबाळे याने तो श्रीराम फायनन्समध्ये काम करतो व बँकेच्या गाड्या कमी दरात विकतो यासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, एक दिवस कोरे यांना फोन करून त्याच्याकडे जुन्या बँकेच्या जप्त केलेल्या चारचाकी गाड्या आहेत याबाबत माहिती दिली. त्यासाठी हडपसर कॅनॉलजवळ सुभाष गॅरेज येथे भेटायला बोलवले. त्याठिकाणी त्याने स्पॉन्सर सुभाष रसाळ व अविनाश कदम यांची ओळख करून दिली. त्यानंतर त्याने कोरे, प्रदीप मोरे व कोरे यांचे काका यांना नसरापूर येथील श्रीराम फायनान्सच्या गोडवूनला बोलावले. तेथील काही गाड्या दाखवल्या. (Pune News) त्यातील काही गाड्या मी पसंत केल्या व आमच्या काकांनी एक गाडी घेतली. उबाळेच्या व्यवहारावर विश्वास झाल्यानंतर मी त्याच्याकडून काही गाड्या विकत घेतल्या. त्यानंतर मी उबाळे यांना सात वाहनांची मागणी केली, त्या वाहनांच्या खरेदीसाठी एकूण १२ लाख ९० हजार ५०० रुपये उबाळे यांना ऑनलाईन व ५ लाख ३० हजार रोख स्वरूपात दिली आहे.
या व्यवहारानंतर वाहनांसाठी मी उबाळे यांना वारंवार संपर्क केला तर त्यांनी टाळाटाळ केली. एकदा तर त्याच्या फोनवरून त्याच्या आईने मला ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तर हडपसर येथील वैशाली हॉटेलमध्ये उबाळे यांनी कोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने कोरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. (Pune News) या टोळी विरोधात हडपसर, पुणे आणि राज्यातून इतर ठिकाणांहून देखील फसवणुकीचे गुन्हे समोर याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्याची त्वरित हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत परिसंवाद; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी
Pune News : बहिणीला छेडल्याच्या रागाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार; आरोपीसह ६ साथीदारांवर ‘मोक्का’